Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
जोशी काकू बेशुद्ध पडल्या. जोशी काकांनी लगेच डॉक्टरांना फोन केला.
डॉक्टर आले.
डॉक्टर - सॉरी. ह्या जिवंत नाहीत!
अंत्यविधीची तयारी झाली. काकूंना सरणावर झोपवले आणि जाळायला लोक पुढं आले. तेवढ्यात काकू उठल्या आणि म्हणाल्या, मी जिवंत आहे.
काका - गपचूप झोपून राहा येडे. डॉक्टरपेक्षा तुला जास्त कळतं का?
जाळा रे जाळा…
…
सोन्या - आज एक मुलगी पाहिली
मोन्या - कशी वाटली?
सोन्या - विचारू नको. तिचा डावा डोळा इतका सुंदर होता की तिचा उजवा डोळा सुद्धा डाव्या डोळ्याकडं बघत होता.
मोन्या - अरे उलट्या खोपडीच्या, चकनी आहे मग ती
…
मुलगी - आई, मला एका मुलानं गालावर कीस केलं…
आई - कानफाटात वाजवलीस का त्या नालायकाच्या?
मुलगी - नाही आई, मला नेमकी त्यावेळी गांधीगिरी आठवली.
आई - मी दुसरा गाल पुढं केला.
आई बेशुद्ध
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)