Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
बंड्या - काकू, पिंट्या आहे का?
थत्ते काकू - आहे ना, गरमागरम उपमा खातोय.
तुला पण भूक लागली असेल ना?
बंड्या - हो काकू
थत्ते काकू - मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये...
तोपर्यंत बंड्याचंही होईल!
….
प्रियकर - मला कळत नाही, तुझ्या घरचे आपल्या लग्नासाठी लगेच कसे तयार झाले?
त्यांनी काही विचारलं नाही का?
प्रेयसी - विचारलं ना
प्रियकर - काय?
प्रेयसी - म्हणाले, पोरगं काय करतं?
मी म्हणाले, पोटात लाथा मारतंय!
…
प्रियकर - कुठे आहेस?
प्रेयसी - मॉम डॅडसोबत हॉटेलमध्ये डिनर करतेय!
घरी गेल्यावर करते कॉल. तू कुठं आहेस?
प्रियकर - तू ज्या भंडाऱ्यात जेवतेयस, तिथं तुझ्या मागच्या पंगतीला भात वाढतोय.
भात लागला तर सांग.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
संबंधित बातम्या