Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
मॅडम - बंड्या, तू लिहिलेली दहाच्या दहा उत्तरं चुकीची आहेत.
बंड्या - नाही मॅडम, माझं फक्त एकच उत्तर चुकलंय.
मॅडम - मुर्खा, तुझी वही परत बघ.
बंड्या वही घेऊन बघितल्यासारखं करतो आणि…
बंड्या - मॅडम मी खरंच बोलतोय. यातली पाच उत्तरं पप्पांची आहेत. चार मम्मीची आहेत. एकच उत्तर माझं आहे.
मॅडम मॅड झाल्या…
…
भूगोलाचे शिक्षक खगोलशास्त्राची माहिती देत असतात. अधूनमधून ते ग्रहताऱ्यांबद्दल विचारतात.
गुरुजी - पप्पू, सांग बघू, पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे?
पप्पू - सर, भावा-बहिणीचा संबंध
गुरुजी - काय?
पप्पू - हो सर, कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो…
गुरुजींनी स्वेच्छानिवृत्ती घेतली…
…
यजमान - आम्ही दार्जिलिंगचा चहा वापरतो.
पुणेकर - व्वा, तरीच छान गार-गार होता.
कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त अपमान
(स्त्रोत - सोशल मीडिया)
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)