मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : नवऱ्याशी भांडण झाल्याचं सून जेव्हा सासूला सांगते…

Joke of the day : नवऱ्याशी भांडण झाल्याचं सून जेव्हा सासूला सांगते…

HT Marathi Desk HT Marathi
Feb 20, 2024 10:33 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

पुरुषाचा मेंदू २४ तास काम करत असतो…

फक्त दोनच वेळा तो काम करत नाही

एकदा परीक्षेचा पेपर देताना आणि

दुसरा बायको पसंत करताना!

विज्ञान कितीही प्रगती करो, एका गोष्टीचं कारण कधीच समजणार नाही

कामाच्या दिवशी सकाळी डोळे का उघडत नाहीत आणि

सुट्टीच्या दिवशी जाग लवकर का येते?

सून : सासूबाई काल रात्री माझं आणि यांचं भांडण झालं?

सासू : (समजावणीच्या सुरात) असू दे गं, नवरा बायकोमध्ये तेवढं चालायचंच!

सून : ते सगळं ठीक आहे हो, पण मला सांगा यांची बॉडी नक्की कुठे नेऊ?

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel

विभाग