Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
गुरुजी - बंड्या, उद्या गृहपाठ करून नाही आलास तर कोंबडा बनवेन!
बंड्या - चालेल गुरुजी, पण जरा झणझणीत बनवा. मी भाकऱ्या घेऊन येईन.
गुरुजी सुट्टीवर गेले…
…
पुण्यातील एका महिलेनं फेसबुकवर दुधात चपातीचा चुरा कालवलेला फोटो शेअर केला.
तो फोटो पाहून कमेंटमध्ये लोक तिला रेसिपी विचारतील हा विचार सुद्धा तिनं केला नव्हता. पण तसं झालंच…
काही बायकांचे कमेंट्स
पहीली : दूध गायीचं घ्यायचं का म्हशीचं?
दुसरी : चपातीचा चुरा हातानं करायचा की मिक्सरमध्ये?
तिसरी : एका चपातीला किती दूध घ्यायचं
चौथी : दुधात साखरेऐवजी गूळ घातला तर चालेल का?
पाचवी : एका चपातीच्या चुऱ्यासाठी किती चमचे साखर वापरायची?
सहावी : दूध थंड घ्यायचं की गरम?
सातवी : चपातीच्या ऐवजी भाकरी घेतली तर चालेल का?
आठवी : चपाती ताजी हवी का शिळी?
या बाईंनी हद्दच केली…
चपातीसाठी गहू दळून आणायचे की विकतचं पीठ चालेल
चपात्या घडीच्या हव्या का फुलके?
विजेता
चपात्या बायकोनं केलेल्या चालतील का रोजच्या प्रमाणे नवऱ्यानंच करायच्या?
(स्त्रोत - सोशल मिडिया)
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
संबंधित बातम्या