Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
सोन्या एकदा नदीकाठी गेला…
नदीच्या मधोमध त्याला एक पाटी दिसली!
त्यानं पाटी वाचायचा प्रयत्न केला, पण लांबून त्याला काही नीट वाचता येत नव्हतं.
त्यानं नदीत उडी मारली.
आणि पोहत पोहत त्या पाटीपर्यंत गेला आणि वाचू लागला…
पाटीवर लिहिलं होतं,
पाण्यात मगरी आहेत. नदीत उडी मारू नये.
…
दोनचा पाढा एका कागदावर लिहून तो जाळल्यानंतर जी राख तयार होते,
तिला काय म्हणतात?
बेचिराख!!!
बसल्या-बसल्या काय सुचेल सांगता येत नाही!
…
बायको : मला सोन्याचा हार घेऊन द्या ना, मी तुम्हाला सात जन्म साथ देईन.
नवरा : मी तुला एक काय दोन हार द्यायला तयार आहे, पण ते साथीचं आणि सोबतीचं या जन्मापर्यंतच ठेव!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)