Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
नवरा - आज बाहेर जेवूया…
बायको - (एकदम खूष होऊन) ठीक आहे. मी पाच मिनिटांत तयार होऊन येते…
नवरा - ये लवकर. तोपर्यंत मी अंगणात चटई टाकतो!
…
गोलू : अरे भोलू, तुला पोहायला येतं का?
भोलू : नाही रे, नाही येत.
गोलू: काय यार, तुझ्यापेक्षा कुत्रा बरा. तो सुद्धा पाण्यात पोहून जातो.
भोलू : तुला पोहता येतं का?
भोलू : हो, चांगलं येतं.
गोलू : मग तुझ्यात आणि कुत्र्यात फरक काय!!
…
ज्या घरातला पुरुष जेवण बनवणं, भांडी घासणं आणि कपडे धुणं शिकतो…
त्या घरात कधी भांडण होत नाही!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)