मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊनही जेव्हा मुलगा नापास होतो…

Joke of the day : सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊनही जेव्हा मुलगा नापास होतो…

HT Marathi Desk HT Marathi
Feb 09, 2024 10:03 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

एका मुलानं सर्व प्रश्नांची उत्तरे दिली, तरीही तो तोंडी परीक्षेत नापास झाला… का?

प्रश्नांची उत्तरं काहीशी अशी होती…

प्रश्न : टिपू सुलतानचा मृत्यू कोणत्या युद्धात झाला?

उत्तर : त्यानं लढलेल्या शेवटच्या युद्धात.

प्रश्न : घटस्फोटाचे मुख्य कारण काय आहे?

उत्तर : लग्न.

प्रश्न : गंगा कोणत्या स्टेटमध्ये वाहते?

उत्तर : लिक्विड स्टेटमध्ये

प्रश्न : भारतात वर्षभरात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो?

उत्तर : जमिनीवर

Joke of the day : मर्द कोणाला म्हणतात असं जेव्हा मुलगा बाबांना विचारतो…

पहिला मित्र ते दुसऱ्या मित्राला म्हणाला, यार, मला आणि माझ्या बायकोला तमीळ भाषा शिकायची आहे. 

दुसरा मित्र : पण अचानक असं काय झालं, की तुम्हा दोघांना तमिळ शिकावं लागतंय?

पहिला मित्र : अरे यार, आम्ही दोघांनी एक तमिळ मूल दत्तक घेतलंय. ते बोलायला लागायच्या आधी भाषा शिकून घ्यावी असा आमचा विचार आहे.

दुसरा मित्र बेशुद्ध…

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel