मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : मर्द कोणाला म्हणतात असं जेव्हा मुलगा बाबांना विचारतो…

Joke of the day : मर्द कोणाला म्हणतात असं जेव्हा मुलगा बाबांना विचारतो…

HT Marathi Desk HT Marathi
Feb 08, 2024 09:52 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

सतत अभ्यासावरून डिवचणाऱ्या आईला वैतागून मुलगा बाबांकडं गेला…

मुलगा - बाबा, तुम्ही आईमध्ये असं काय बघितलं की तिच्याशी लग्न केलंत?

बाबा - तुझ्या आईच्या गालावर छोटासा तीळ आहे, त्याच्या प्रेमात पडलो.

मुलगा - कमाल आहे तुमची. एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी इतकं मोठं संकट ओढवून घेतलं तुम्ही!

Joke of the day : घरी आलेले पाहुणे जेव्हा मुलाला करियरबद्दल विचारतात…

बंड्या त्याचा रिझल्ट घेऊन सहीसाठी बाबांकडं गेला.

बाबांनी बंड्याचा रिझल्ट बघून त्यावर अंगठा दिला.

बंड्या बावचळला! 

तो म्हणाला, बाबा तुम्ही इंजिनीअर असून अंगठा काय देता?

बाबा - (कुत्सितपणे) तुला मिळालेले मार्क बघता, तुझ्या मॅडमना कळायला नको की तुझे आईवडील शिकलेले आहेत. 

पिंट्या - बाबा, मर्द कोणाला म्हणतात?

बाबा - घरात ज्याचा शब्द चालतो, जो सर्वांना हुकूम सोडतो. ज्याच्यापुढं बोलण्याची कुणाची हिंमत होत नाही, त्याला मर्द म्हणतात.

पिंट्या - बाबा, मी मोठा होऊन आईसारखा मर्द होणार…

बाबा चप्पल घालून फिरायला निघून जातात

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel