मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : घरी आलेले पाहुणे जेव्हा मुलाला करियरबद्दल विचारतात…

Joke of the day : घरी आलेले पाहुणे जेव्हा मुलाला करियरबद्दल विचारतात…

HT Marathi Desk HT Marathi
Feb 07, 2024 09:48 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

संता-बंताची परीक्षा सुरू होती. इतिहासाचा पेपर होता. दोघेही एकाच वेळी पेपर देऊन वर्गाबाहेर पडले…

संता - काय मग, कसा गेला पेपर?

बंता - काही नाही रे… एकदम बेक्कार

संता - का रे काय झालं?

बंता - अरे सगळे माझ्या जन्माआधीचे प्रश्न होते!

थत्ते काकांच्या घरी एक दिवस पाहुणे येतात.

थत्ते काकांचा मुलगा चिंटू रिमोट हातात घेऊन चॅनेल बदलत बसलेला असतो.

पाहुणे इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात आणि चिंटूकडं वळतात…

काय मग चिंटू, मोठा होऊन काय करायचं ठरवलंयस?

चिंटू - मोठा होऊन काय वाट्टेल ते करेन, पण एखाद्याच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाला असले फालतू प्रश्न विचारणार नाही.

पाहुण्यांनी जाईपर्यंत चिंटूकडं पाहिलंही नाही!

 

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel