Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
पेशंट : डॉक्टर साहेब, तुम्ही प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलेल्या औषधांपैकी सर्वात वर लिहिलेलं औषध मिळत नाहीए
डॉक्टर : ते औषध नाही, मी फक्त पेन चालतंय की नाही ते तपासत होतो…
पेशंट: अहो, तुमच्या या पेन चालवून बघण्यापाई मी सर्व मेडिकल दुकानं फिरलो.
एका मेडिकलवाला तर असं म्हणाला की आज उपलब्ध नाही, उद्या मी आणून देईन...
दुसरा म्हणाला...
ही कंपनी बंद झालीय.. दुसऱ्या कंपनीचं औषध दिले तर चालेल का?
तिसरा म्हणाला...
या औषधाला खूप मागणी आहे... हे फक्त ब्लॅकमध्ये मिळू शकतं!
…
आताच्या जमान्यात घरी येणाऱ्या वडीलधाऱ्या पाहुण्याच्या पाया पडणं म्हणजेच त्यांचा सन्मान नाही.
आता पाहुणे घरी आल्यावर मोबाईल बाजूला ठेवणं हा त्यांचा खरा सन्मान ठरतो…
काही आठवलं का?…
(स्त्रोत : सोशल मीडिया)
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)