Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
मीडियाच्या कंपनीत मुलाखती सुरू होत्या.
मुलाखती घेणारे एका मागोमाग एक आत जात होते, बाहेर येत होते.
मुलाखतकार अवघड प्रश्न विचारून सगळ्यांना भंडावून सोडत होता.
शेवटी बंड्याचा नंबर आला!
बंड्या एकदम अपटूडेट आला होता. सफेद शर्ट, टाय वगैरे लावून होता.
बंड्याची पर्सनॅलिटी बघून मुलाखतकार खूष झाले.
हा माणूस कामाचा वाटतो असं त्यांचं पहिलं इम्प्रेशन होतं.
प्रश्नोत्तराला सुरुवात झाली.
मुलाखतकार - मला सांगा, वर्तमानपत्र आणि रेडिओमध्ये काय फरक आहे?
बंड्या - (थोडा विचार करून) सर, वर्तमानपत्र आणि रेडिओमध्ये एक मूलभूत फरक आहे. हा फरक समजून घेतला तर अनेकांच्या अनेक गोष्टी सुकर होतील.
मुलाखतकार प्रभावित झाले. इतका विचार करून उत्तर देणारा बंड्या पहिला उमेदवार होता.
मुलाखतकार - तो फरक कोणता?
बंड्या - सर, वर्तमानपत्रामध्ये तुम्ही चपात्या गुंडाळू शकता, रेडिओमध्ये ते शक्य नाही.
मुलाखतकार अजूनही धक्क्यात आहे…
…
बायको, चांदण्या रात्री आकाशाकडं बघत नवऱ्याला विचारते,
अहो, मला सांगा. अशी कोणती गोष्ट आहे. जी तुम्ही रोज बघू शकतं पण तोडू शकत नाही.
नवरा - मी नाही सांगणार.
बायको - सांगा ना, प्लीज
नवरा - तुझं तोंड.
.
.
चार दिवस झाले नवरा मास्क लावून ऑफिसात जातोय…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
संबंधित बातम्या