Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
बायको नवऱ्याला जेवण वाढते. नवरा जेवायला सुरुवात करतो…
काही न बोलता मान खाली घालून तो जेवत असतो.
थोड्या वेळानं…
बायको - कसं झालंय जेवण?
नवरा - तू पण ना, भांडायचं निमित्तच शोधत असतेस!
काय समजलात?
…
१० इंग्रज, ५ आफ्रिकन, १ भारतीय हेलिकॉप्टरच्या दोरीला लटकलेले असतात!
पायलट: वजन खूप आहे, एका व्यक्तीला दोरी सोडावी लागेल.
भारतीय: हा त्याग मी करणार, कारण मी भारतीय आहे.
वाजवा टाळ्या…
सर्व इंग्रज आणि आफ्रिकन टाळ्या वाजवायला लागतात, वजन आपोआप कमी होतं.
इंग्रज असो वा आफ्रिकन, भारतीय हा भारतीयच असतो!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)