Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
बायको जर काही बोलली तर स्वत:ची मान वर-खाली करा!
हा योग सर्व योगाचा बाप आहे!
…
बाबा - बबन, लक्षात ठेव. गणिताच्या पेपरमधली जेवढी उत्तरं चुकतील, तेवढ्या छड्या मारेन.
संध्याकाळी बबनला वडील म्हणाले, किती प्रश्न चुकले?
बबन - एक पण नाही बाबा, मी तुमची धमकी लक्षात ठेवली.
बाबा - म्हणजे तू सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर लिहिली. हो ना?
बबन - नाही बाबा. मी एकही प्रश्न सोडवला नाही!
…
एक पुणेरी मुलगा त्याची कार धुवत होता…
तिथून शेजारच्या काकू जात होत्या…
काका - काय बंड्या, कार धुतोयस का रे?
बंड्या - नाही काकू, कारला पाणी देतोय. बघू मोठी झाल्यावर बस होतेय की ट्रक
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)