Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
ती : लग्न झाल्यावरही तू माझ्यावर असंच प्रेम करशील का?
तो : हो. कधी आहे तुझं लग्न?
…
लग्न समारंभ सुरू असतो.
हॉलवर सगळीकडं लगबग असते.
काही लोक मुलाच्या वडिलांना शोधत असतात.
एक पांढरेशुभ्र कपडे घातलेला माणूस भेटतो. ते विचारतात,
तुम्ही वर पिता का?
तो माणूस म्हणतो, असं काही नाही. खाली व्यवस्था केली असेल तर तिथंही चालेल!
…
एकदा एका गावात तलाठ्याच्या मागं कुत्रा लागतो…
तलाठी पुढं, कुत्रा मागं…
शेवटी एक झाडं दिसतं. तलाठी लगबगीनं झाडावर चढतो आणि कुत्र्याला म्हणतो,
साल्या तुझ्याकडे गुंठाभर जरी जमीन असती ना तर तुला समजलं असतं कुणाशी पंगा घेतला ते!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप )