Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एक कंजूस बाप त्याच्या पोराल बदडत होता…
शेजारी म्हणाला, भाऊ का मारताय पोराला?
कंजूस बाप म्हणाला, मी ह्याला सांगितलं एक पायरी सोडून पाय टाक. चप्पल कमी झिजेल
नालायकानं दोन पायऱ्या सोडून पाय टाकला आणि लेंगा फाडून घेतला!
…
शाळेत विज्ञानाचा वर्ग सुरू असतो…
मॅडम - एक दिवस असा येईल की
पृथ्वीवर पाणी नसेल.
सगळी जीवसृष्टी संपून जाईल.
बंड्या - मॅडम, त्या दिवशी शाळेत यायचं का?
(बंड्याचा चेहरा काळानिळा पडलाय)
…
लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी पप्पू त्याच्या बायकोला घराच्या अंगणात खेचून खेचून मारत होता…
आरडाओरडा ऐकून लोक धावत आले!
पप्पूला विचारू लागले, असं काय झालं?
पप्पू म्हणाला, माझ्यावर मोहिनी टाकण्यासाठी हिनं माहेरातून आणलेलं तावीज चहात बुडवून मला प्यायला देत होती…
बायको रडत रडत म्हणाली, आडाणी कुठला?
ती टी बॅग होती!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या