Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
बहिणीच्या हळदीच्या रात्री…
बंड्या - आई, तू दमली असशील. थांब मी भांडी घासतो.
आई - नको तू झोप. तुला जास्त झाली असेल.
बंड्या - पण तुला कसं समजलं आई?
आई - मेल्या तू पत्रावळ्या घासायला घेतल्या आहेत.
…
पोलीस : तू एकाच दुकानातून सलग तीन दिवस चोरी केलीस.
चोर: नाही साबेह, मी एकाच दिवशी माझ्या पत्नीसाठी एक ड्रेस चोरला होता.
मग बाकीचे दोन दिवस तू दुकानात कशाला गेला होतास?
नंतरचे दोन दिवस ड्रेसचा रंग बदलायला गेलो होतो...
…
अंगठा लावल्यानंतर अंगठ्यावरील शाई इथल्या भिंतीला पुसू नका.
त्या खाली कुणीतरी खूप छान वाक्य लिहिलं,
"अहो, वर लिहिलेली माहिती वाचता आली असती तर
अंगठा का लावला असता?
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या