Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
नवरा धावत धावत हॉटेलच्या मॅनेजरकडं गेला आणि
ओरडतच म्हणाला,
लवकर चला...
माझी बायको खिडकीतनं उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न करतेय
मॅनेजर - मग मी काय करू?
नवरा - खिडकी उघडत नाही.
...
बायको : अहो ऐकलंत का?
वरून ती पिशवी काढा! माझा हात पोहोचत नाहीए
नवरा - मग जिभेनं ट्राय कर
(नवऱ्याची दिवसभर चंपी)
...
पोलीस - दार उघडा, आम्ही पोलीस आहोत.
बंड्या - माझ्याकडं काय काम आहे?
पोलीस - आम्हाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे.
बंड्या - किती जण आहात तुम्ही?
पोलीस- आम्ही तिघे जण आहे.
बंड्या - मग तुम्ही आपसात बोला, मला वेळ नाही.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)