Joke of the day : पहिल्यांदाच भारतात आलेला इंग्रज जेव्हा मच्छरांच्या त्रासानं हैराण होतो…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : पहिल्यांदाच भारतात आलेला इंग्रज जेव्हा मच्छरांच्या त्रासानं हैराण होतो…

Joke of the day : पहिल्यांदाच भारतात आलेला इंग्रज जेव्हा मच्छरांच्या त्रासानं हैराण होतो…

HT Marathi Desk HT Marathi
Updated May 07, 2024 05:04 PM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day :  पहिल्यांदाच भारतात आलेला इंग्रज जेव्हा मच्छराच्या त्रासानं हैराण होतो…
Joke of the day : पहिल्यांदाच भारतात आलेला इंग्रज जेव्हा मच्छराच्या त्रासानं हैराण होतो…

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

एका मुलीचं लग्न होत असतं…

वऱ्हाड्यांमध्ये मुलीचा आधीचा प्रियकर सुद्धा असतो!

मुलीच्या बापानं त्याला आधी कधी पाहिलेलं नसतं.

मुलीचा बाप विचारतो, आपण कोण?

प्रियकर मुलगा - काका, मी सेमीफायनलमध्ये आउट झालो होतो, आता फायनल बघायला आलोय.

हेही वाचा : रक्तदान करून आलेल्या बायकोला जेव्हा नवरा विचारतो की कुठं गेली होतीस…

पहिल्यांदाच भारतात आलेला एक इंग्रज रात्री मच्छरांच्या त्रासानं हैराण झाला…

हॉटेलमधल्या पोऱ्यानं त्याला लाइट बंद करायला सांगितली

इंग्रजानं तसं केलं!

त्यानंतर एक काजवा हॉटेलच्या रूममध्ये घुसला!

इंग्रजाच्या पायाखालची वाळूच सरकली!

त्यानं ओह माय गॉड, ओह माय गॉडचा जप सुरू केला.

म्हणाला, भारतातले मच्छर किती प्रगत आहेत,

टॉर्च घेऊन माणसाला शोधतात!

खाली गर्दी असल्यामुळं कंडक्टरनं त्याला वर पाठवला

थोड्या वेळानं संता धावत-धावत खाली आला…

आणि कंडक्टरला म्हणाला,

काय मारून टाकायचा इरादा आहे का?

कंडक्टर चकीत होऊन विचारू लागला, झालं काय?

वरती ड्रायव्हर कुठं आहे?

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner