Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!
शाळेतले एक सर मास्तर पैसे काढायला एटीएम केंद्रात गेले. एटीएम मशीन खराब होतं. चेकबुक जवळच असल्यानं ते बँकेत गेले आणि एक हजार रुपयांचा चेक भरून कॅशियरकडे दिला.
कॅशियर म्हणाला, 'सर, पाच हजारांहून कमी रकमेला चार्ज लागेल.' मास्तरांनी दुसरा चेक सहा हजारांचा लिहिला. कॅशियरनं सहा हजार मास्तरांना दिले.
मास्तरांनी त्यातले एक हजार खिशात ठेवले आणि पाच हजार रूपये पुन्हा खात्यात भरण्यासाठी कॅशियरकडे दिले.
कॅशियर चिडला होता. सर म्हणाले, 'हा नियम बनवणारा तुमचा साहेब आहे ना, तो माझ्याच वर्गात शिकत होता. त्याला सांगा, तुझे सर आले होते.
…
आज तिच्या लग्नात गेल्यावर समजलं की,
जेवण चांगलं असलं की,
खऱ्या प्रेमाचाही विसर पडतो…
पुरी दे रे अजून…!
…
हम आज भी शतरंज का खेल अकेलेही खेलते है,
क्योंकी दोस्तो के खिलाफ चाल चलना हमे आता ही नही.
असं स्टेट्स ठेवणारी पोरं,
.
.
.
स्वतःची बॅटिंग झाली की बॅट घेऊन पळून जातात.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या