Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
जीवशास्त्राचे शिक्षक - सेल म्हणजे शरीरातील कोशिका
भौतिकशास्त्राचे शिक्षक - सेल म्हणजे बॅटरी
अर्थशास्त्राचे शिक्षक- सेल म्हणजे विक्री
इतिहासाचे शिक्षक - सेल म्हणजे तुरुंगातील कोठडी
इंग्रजीचे शिक्षक - सेल म्हणजे मोबाइल
मी शाळाच सोडून दिली.
ज्या शाळेत पाच शिक्षकांचं एकमत होत नाही. त्या शाळेत शिकून काय फायदा?
आता कुठं सेलचा खरा अर्थ कळलाय!
बायका - सेल म्हणजे डिस्काऊंट
…
मुलगी - तुझं शिक्षण किती झालंय हिंदीत सांग
मुलगा - नेत्र चाय नेत्र
मुलगी - ही कसली डिग्री आहे?
मुलगा - आय टी आय
(मुलगी बेशुद्ध आहे)
…
गर्लफ्रेंड - कुठे आहेस तू?
मुलगा - बँकेत आहे.
गर्लफ्रेंड - मग मला १८००० रुपये नवीन फोनसाठी आणि २००० रुपये कपडे घेण्यासाठी आण.
मुलगा - ब्लड बँकेत आहे.
रक्त पिणार का रक्त?
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या