Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
संतू - कधी आपल्या हातून चूक झाली तर काय करायचं माहित्येय?
अंतू - काय करायचं?
संतू - काही नाही. शांत बसून विचार करायचा की आळ कुणावर घ्यायचा?
…
बायको गुलामजाब खात होती…
नवऱ्यानं ते बघितलं आणि म्हणाला,
बघूया टेस्ट कशी आहे?
बायकोनं त्याला एक गुलाबजाम दिला.
नवरा म्हणाला, एकच?
बायको - हो. बाकी सगळ्याची चव सुद्धा तशीच आहे.
…
शामूच्या हातात नवीन मोबाइल बघून रामू म्हणाला,
नवीन मोबाइल घेतला काय?
शामू - नाही रे गर्लफ्रेंडचा आहे.
रामू - तिचा मोबाइल तू कशाला आणलास?
शामू - रोज बोलायची रे, तू माझा फोन उचलत नाहीस म्हणून
आज चान्स मिळाला उचलला!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या