Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एकदा दोघी शेजारी आपापसात बोलत होत्या.
पहिली - तुला माहीत आहे का मला २५ वर्षापर्यंत मूलच नव्हतं.
दुसरी - काय सांगतेस? मग तू काय केलंस?
पहिली - मी २५ वर्षांची झाले तेव्हा घरच्यांनी माझं लग्न केलं आणि नंतर मला एक मूल झालं.
(दुसरी शेजारी आता आयसीयूमध्ये अॅडमिट आहे)
…
गुरुजी : शाळेच्या समोर कुणी बॉम्ब ठेवला तर तुम्ही काय करणार?
बंड्या - गुरुजी, थोडा वेळ वाट बघू, कुणी उचलला तर ठीक आहे
नाहीतर स्टाफ रूममध्ये नेऊन ठेवू...!
(गुरुजींनी बंड्याला चोप चोप चोपला)
…
एका लग्नात संत्या खूप उशिरापर्यंत जेवत होता.
अंतू : अरे किती खाणार? बस कर आता
संतू : अरे मला पण जेवून जेवून कंटाळा आलाय, पण काय करू?
पुत्रिकेतच लिहिलंय ना की जेवणाची वेळ संध्याकाळी ७ ते १० पर्यंत आहे म्हणून.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या