Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
पोलीस - तू एवढी दारू का प्यायलास?
दारुडा - काय करू साहेब, माझा नाईलाज होता.
पोलीस - कसला नाईलाज?
दारुडा - साहेब माझ्या दारूच्या बाटलीचं झाकणच सापडत नव्हतं.
…
बायको - लग्नाच्या आधी तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करायचात
हॉटेलात घेऊन जायचा, सिनेमाला घेऊन जायचा. कुठं-कुठं फिरवायचा.
पण लग्न झाल्यापासून घराच्या बाहेरही घेऊन जात नाही.
नवरा - निवडणूक झाल्यावर कोणी प्रचार करतं का?
…
एकदा एका बँकेवर दरोडा पडतो. दरोडेखोर सगळं लुटून नेतात.
जाताना एक दरोडेखोर क्लर्कला विचारतो,
चोरी करताना तू मला बघितलं का?
क्लर्क हो म्हणतो. दरोडेखोर त्याला गोळी घालतो.
दुसऱ्याला विचारतो - तू काही पाहिलंस का?
तो माणूस - नाही. माझ्या बायकोनं पाहिलं.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)