Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
गरिबीनं त्रासलेला एक माणूस म्हणाला…
अशा आयुष्यापेक्षा मेलेलं बरं!
त्याचं हे वाक्य संपतं ना संपतं तोच यमराज त्याच्या पुढ्यात हजर झाला आणि म्हणाला,
चल, मी तुला न्यायला आलोय!
त्याचं हे वाक्य ऐकून गरीब माणूस म्हणाला,
काय चालवलंय बाबा? गरीब माणूस जोकही करू शकत नाही का?
…
राजेश - साहेब, माझ्या बायकोला पाच-सहा दिवसांसाठी माझ्यासोबत फिरायला जायची इच्छा आहे.
बॉस - मग मी काय करू?
राजेश - साहेब, सुट्टी पाहिजे होती!
बॉस - सुट्टी मिळणार नाही.
राजेश - थँक्यू साहेब, मला माहीत होतं संकटाच्या काळात तुम्हीच माझ्या मदतीला धावणार!
…
वर्गात इतिहासाचा तास सुरू असतो…
गुरुजी - मुलांनो सांगा, शहाजहान कोण होता?
बंड्या - गुरुजी, शहाजहान एक मजूर होता.
गुरुजी - हे तुला कुणी सांगितलं?
बंड्या - तुम्हीच गुरुजी. तुम्हीच म्हणाला होता ना की शहाजहाननं खूप इमारती बांधल्या होत्या म्हणून.
(गुरुजी आजारपणाच्या रजेवर गेलेत)
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)