Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
डॉक्टरांनी थर्मामीटर महिला पेशंटच्या तोंडात ठेवून तोंड बंद करायला सांगितलं…
तिला खूप वेळ शांत राहिलेली पाहून…
त्या महिलेच्या नवऱ्यानं भावूक होऊन विचारलं,
डॉक्टर साहेब, ही दांडी किती रुपयाला मिळते?
…
मुंबईहून पुण्याला जाताना नेमकं काय होतं?
तापमानात घट होते आणि अपमानात वाढ होते!
…
डॉक्टर - तुम्हाला कुठं दुखतंय?
पेशंट - फी कमी करणार असाल तर सांगतो
नाहीतर तुम्हीच शोधा!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)