Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर शाळा पुन्हा भरते…
गुरुजी - मुलांनो, दिवाळीत तुम्ही असं काय शिकलात, जे तुम्हाला आयुष्यभर उपयोगी ठरू शकतं?
.
.
बंड्या - काडी लावली की पळून जायचं!
…
आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेशर कधी येतं?
जेव्हा तुमच्या तोंडात एक पाणीपुरी असते…
दुसरी तुमच्या प्लेटमध्ये असते आणि
तिसरी पाणीपुरी घेऊन भैय्या तुमच्याकडं बघत असतो तेव्हा…
तुम्हाला काही आठवलं असेल तर तो योगायोग समजावा!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)