मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : मुलगा जेव्हा मुलीचा हात मागण्यासाठी तिच्या बाबांना भेटतो…

Joke of the day : मुलगा जेव्हा मुलीचा हात मागण्यासाठी तिच्या बाबांना भेटतो…

HT Marathi Desk HT Marathi
Jan 30, 2024 10:23 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

रिंकीचा हात मागायला राजू तिच्या बाबांकडं जातो…

रिंकीचे वडील - महिन्याला साधारण किती कमावतोस?

राजू - १८,०००

रिंकीचे बाबा - काय? मी माझ्या पोरीला १५,००० फक्त पॉकेटमनी देतो.

राजू - ते मिळवूनच सांगतोय काका.

काका बेशुद्ध

गुरुजींनी वर्गात विचारले, डेट आणि तारीख यात काय फरक आहे?

बंड्या - गुरुजी डेटला मुलीसोबत जातात आणि तारखेला वकिलासोबत.

गुरुजींनी बंड्याला धु-धु धुतला!

Joke of the day : बरं झालं १९४७ साली व्हॉट्सअ‍ॅप नव्हतं, नाहीतर…

पिंकी - डॉक्टर साहेब, मला एक विचित्र आजार झालाय.

डॉक्टर - कुठला?

पिंकी - मी जेव्हा एखाद्याशी बोलते ना, तेव्हा तो मला दिसत नाही.

डॉक्टर : असं कधी आणि किती वेळा होतं?

पिंकी - जेव्हा, जेव्हा मी फोनवर बोलते तेव्हा.

(डॉक्टर अजूनही बेशुद्ध आहे)

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel