मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : बरं झालं १९४७ साली व्हॉट्सअ‍ॅप नव्हतं, नाहीतर…

Joke of the day : बरं झालं १९४७ साली व्हॉट्सअ‍ॅप नव्हतं, नाहीतर…

HT Marathi Desk HT Marathi
Jan 29, 2024 12:13 PM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

अकबरनं बिरबलाला तीन प्रश्न विचारले आणि म्हणाला तिन्ही प्रश्नाचं उत्तर एकच असायला हवं.

दूध का ऊतू जातं?

पाणी का वाहून जातं?

भाकरी का करपते?

बिरबलानं उत्तर दिलं, व्हॉट्सअ‍ॅपमुळं!

अकबरानं बिरबलचे पाय धरले!

Joke of the day : एका माशीचं लग्न एका डासाशी झालं आणि…

१९४७ साली व्हॉट्सअ‍ॅप नव्हतं म्हणून बरं नाहीतर…

स्वातंत्र्य लढ्यासाठी कोणी मैदानात उतरलंच नसतं.

घरात बसूनच लोक म्हणाले असते की,

हा मेसेज इतका पसरवा की इंग्रज स्वत:च देश सोडून पळतील!

एकेकाळी आपली पृथ्वी खूप सुंदर होती.

नंतर…

गुटखा खाणाऱ्यांचा जन्म झाला!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel