Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
संता आज खूप खूश होता… गावातल्या पोरांसोबत फिरत होता!
तो म्हणाला, जो माझी एक इच्छा पूर्ण करेल त्याला मी एक लाख रुपये देईन
गाववाल्यांमध्ये चर्चा सुरू झाली.
काही लोकांनी शेवटी जाऊन त्याला विचारलं, काय आहे तुझी इच्छा?
संता म्हणाला, मला दोन लाख रुपये पाहिजेत.
गाववाल्यांनी संताला पळवून पळवून मारला!
…
बायको : किती बरं झालं असतं जर मी तुमचा मोबाइल असते.
नवरा : का गं?
बायको : तुम्ही सतत मला बघत बसला असता. खिशात घेऊन फिरला असता
नवरा : हो ना खूपच बरं झालं असतं. तो पडून फुटला असता तर लगेच बदलला पण असता!
बायको कोमात, नवरा जोमात
…
बायकोनं नेट रिचार्ज मारायला सांगितला…
नवऱ्यानं ऑनलाइन रिचार्ज करून टाकला!
बिच्चारा, सकाळपासून तिचं बोलणं खातोय.
ऑनलाइन रिचार्ज का केला?
ऑनलाइन वस्तू खराब असतात… नेट स्लो चालतंय माझं!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)