Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
बायको : मी तुमच्यासाठी किती धावपळ करते. लग्नानंतर काम करून करून माझे हात छोटे झालेत!
नवरा : (आश्चर्याने) काय म्हणतेस? तुला कसं कळलं? तू मापले का?
बायको : हो. आधी मी व्यायाम करायचे तेव्हा हातानं पायाचं अंगठा सहज पकडायचे. आज लग्नाच्या १५ वर्षानंतर माझे हात गुडघ्यापर्यंतही जात नाहीत.
…
एकदा मित्र मला म्हणाला,
यार तू निवडणूक का लढत नाहीस?
मी म्हणालो, एकदा जिची निवड केलीय, तिच्याशी लढायलाच वेळ पुरत नाही.
निवडणूक काय डोंबलाची लढणार?
प्रेयसी - आजपासून आपले संबंध संपले!
आपण एकमेकांना दिलेले गिफ्ट परत करूया…
प्रियकर - ठीक आहे. मोबाइल रिचार्जपासून सुरुवात करूया!
प्रेयसी - काय बाबू? मस्करी पण करू शकत नाही का?
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)