Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
लग्नानंतर नवरे कसे बदलतात, बघा!
पहिल्या वर्षी : अगं राणी सांभाळून, तिकडं खड्डा आहे!
दुसऱ्या वर्षी : अगं नीट चाल, तिथं खड्डा आहे!
तिसऱ्या वर्षी : तुला दिसत नाही का? तिथं खड्डा आहे
चौथ्या वर्षी : आंधळी आहेस का? खड्डा दिसत नाही?
.
.
पाचव्या वर्षी : तिकडं कुठं मरायला चाललीस? खड्डा तर इथं आहे!
एक मुलगी फोनवर बोलत बोलत लिफ्टमध्ये शिरली…
माझ्याकड बघून हसली आणि तिच्या मैत्रिणीला म्हणाली,
चल आता फोन ठेवते.
लिफ्टमध्ये एक हँडसम मुलगा आहे.
बघू काही जुळतं का?
हे ऐकून मी काही बोलणार इतक्यात ती म्हणाली,
सॉरी काका, माझी मैत्रीण एक नंबरची फेकाडी आहे. खूप बोलते.
मला फोन ठेवायचा होता. म्हणून खोटं बोलावं लागलं.
आई शप्पथ! इतक्या प्रेमानं आजपर्यंत कुणी कुणाची इज्जत काढली नसेल.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
संबंधित बातम्या