Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
एका झुरळाचा लिलाव होत असतो… लोकांची प्रचंड झुंबड उडालेली असते…
पहिली बोली - १ लाख
दुसरी बोली - ५ लाख
तिसरी बोली - ५० लाख
चौथी बोली - १ कोटी
हे सगळं सुरू असतानाच पोलीस येतात. लिलाव बंद पाडतात. प्रकरण कोर्टात जातं.
तिथं न्यायाधीशांच्या समोर पुन्हा लिलाव सुरू होतो…
पहिली बोली - १ लाख
दुसरी बोली - ५ लाख
तिसरी बोली - ५० लाख
चौथी बोली - १ कोटी
चढाओढ सुरूच असते. त्यामुळं न्यायाधीश संतापतात.
या झुरळात एवढं काय आहे की तुम्ही करोडो रुपये मोजताय?
जज साहेब, ही एकच गोष्ट अशी आहे, ज्याला बायको घाबरते…
जज म्हणाले - ४ कोटी
बंड्याला फायर ब्रिगेडमध्ये नोकरी मिळाली!
एका महिलेचा फोन आला.
हॅलो, आमच्या घरात आग लागलीय.
बंड्या - तुम्ही पाणी टाकलं का?
बाई - हो. पण आग काही विझत नाहीए.
बंड्या - अहो मॅडम, मग आम्ही तिथं येऊन काय करणार?
आम्ही सुद्धा पाणीच टाकणार ना?
त्या बाईंचं नाव दुसऱ्या दिवशी पेपरात आलं….
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)