Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
एका माशीचं लग्न एका डासाशी झालं…
दुसऱ्याच दिवशी माशी रडायला लागली!
माशीच्या लहान बहिणीनं रडण्याचं कारण विचारलं…
तर मोठी माशी म्हणाली, मी रात्री गुडनाइट लावलं आणि…
तुझे भावोजी वारले!
भारतातील एकतर्फी प्रेम करणाऱ्या लोकांना वेगळं काढलं तर त्यांचा एक वेगळा देश होईल!
आणि त्याचं राष्ट्रगीत असेल…
तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है…
…
पूर्वी मी खूप गरीब होतो.
तेव्हा माझ्या मित्रानं मला सल्ला दिला…
आयपीएलवर सट्टा लावण्याचा!
आज माझ्या घरासमोर दोन स्कॉर्पियो आणि एक बोलेरी उभी आहे…
मला चौकीवर घेऊन जायला आलीय…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)