Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
तुम्ही खूप नशीबवान आहात…
तुम्हाला सगळे ऋतु एकाच वेळी बघायला मिळतात!
सकाळी ५ ते ११ थंडी
दुपारी १२ ते ४ उकाडा
संध्याकाळी ५ ते रात्री ८ पाऊस
पूर्वी लोकांना हे सगळं बघायसाठी ४-४ महिने वाट बघायला लागायची!
…
काही वर्षांपूर्वी माझ्या मित्राला साधा चमचा धुवायला येत नव्हता!
मग मी त्याला सल्ला दिला, लग्न कर!
आता पठ्ठ्या भांडी आणि कपडे दोन्ही धुतो!
एका मित्राच्या बायकोनं माझ्यासमोरच त्याला उलटासुलट सुनावलं…
अर्धा तास ती मित्राची शाळा घेत होती!
सगळं बोलून झाल्यावर शेवटी ती म्हणाली,
साधी-भोळी आहे म्हणून वाचलात, नाहीतर दोन दिवसात तुम्हाला सरळ केलं असतं!
माझे डोळेच भरून आले!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)