Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
सासऱ्यानं आपल्या जावयाला भेट म्हणून एक हेल्मेट दिलं…
जावई - माझ्याकडं बाइक नाहीए. हेल्मेटचं काय करू?
सासरा - जावई बापू, तुमच्या सासूबाईंनी तुमच्या बायकोला लाटणं गिफ्ट दिलंय.
…
एक कटू सत्य…
एखादी बाई रागात असली की एका तासात सगळं सामान पॅक करते.
पण जर कुठं फिरायला जायचं असलं तर
आठ-आठ दिवस पॅकिंग होत नाही!
एक मुलगा मुलगी बघायला गेला.
इम्प्रेशन पाडण्यासाठी त्यानं विचार केला की हिच्याशी इंग्लिशमध्ये बोलूया…
त्यानं आधी तिला विचारलं, इंग्लिश चालेल ना!
मुलगी म्हणाली, चकना असेल तर देशी पण चालेल!
मुलगा बेशुद्ध
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)