मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : मरताना बायको जेव्हा नवऱ्याला म्हणते, आता स्वर्गात भेटू…

Joke of the day : मरताना बायको जेव्हा नवऱ्याला म्हणते, आता स्वर्गात भेटू…

HT Marathi Desk HT Marathi
Jan 22, 2024 10:10 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

आई : पोरी, स्थळ आलंय तुझ्यासाठी…

नवरा खूप श्रीमंत आहे!

मुलगी : पण आई मला गरीब मुलाशी लग्न करायचंय.

आई : होईल गं गरीब, तुझ्याशी लग्न केल्यानंतर…

मृत्यूच्या शेवटच्या क्षणी बायको नवऱ्याला म्हणाली,

मी जाते… आता स्वर्गातच भेटू!

त्या दिवसापासून नवरा दारू पिऊ लागला, जुगार खेळू लागला…

जी जी काही वाईट कामं आहेत ती करू लागला!

त्यानं मनाशी पक्कं ठरवून टाकलं होतं…

स्वर्गात जायचं नाही म्हणजे नाही!

याला म्हणतात दहशत!!!!

आजचं ज्ञानामृत…

बायको रागात येऊन चिडचिड करायला लागली की तिच्यासोबत सेल्फी घ्या…

ती सगळं विसरून स्माइल करू लागेल!

तुम्हीही जगात ताठ मानेने फिरू शकता…

फक्त एक दिवस मोबाइल घरी विसरून जा!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel