Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
एक जण रात्री दारू पिऊन घरी आला आणि दरवाजा ठोठावू लागला…
बायकोनं बराच वेळ दरवाजा उघडलाच नाही!
शेवटी तिनं रागानं विचारलं, कोण आहे?
नवरा म्हणाला, एका सुंदर मुलीसाठी मी गजरा घेऊन आलोय…
बायकोनं खूष होऊन लगेच दरवाजा उघडला. पाहिलं तर नवऱ्याच्या हातात काहीच नव्हतं.
बायको म्हणाली, गजरा कुठंय?
नवरा म्हणाला, सुंदर मुलगी कुठंय?
सीआयडी अधिकाऱ्यानं वॉचमनला विचारलं…
तू त्या चोराला पाहिलंयस ना?
वॉचमन म्हणाला, नाही साहेब. पण त्याच्या हाताच्या बोटांचे ठसे माझ्याकडं आहेत.
अधिकारी - ठीक आहे. कुठं आहेत ठसे?
वॉचमन - माझ्या गालावर…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)