Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
नवरा : माझ्या जखमेवर मीठ चोळायची तुझ्या बाबांची सवय अजून गेली नाही!
बायको : का, काय झालं?
नवरा : मला आज पुन्हा विचारत होते की माझ्या मुलीबरोबर लग्न करून खूष आहात ना?
…
मुलगी : मी माझ्या बाबांची परी आहे.
मुलगा : मी माझ्या बाबांचा पारा आहे.
मुलगी : पारा? ते काय असतं?
मुलगा : मला बघितलं की माझ्या बाबांचा 'पारा' चढतो…
वर्गात इंग्रजीचा तास सुरू असतो. मॅडम बंड्याला सांगतात,
एबीसीडी बोलून दाखव!
बंड्या : ABCDEHI
मॅडम : ये काय बोलतोयस… GF कुठं आहे?
बंड्या : ती लहानपासूनच माझ्या नशिबात नाय
मॅडमनी बंड्याला धु-धु धुतला…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)