मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : डॉक्टर जेव्हा पेशंटला रोज १० किलोमीटर चालण्याचा सल्ला देतो…

Joke of the day : डॉक्टर जेव्हा पेशंटला रोज १० किलोमीटर चालण्याचा सल्ला देतो…

HT Marathi Desk HT Marathi
Jan 17, 2024 11:15 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

डॉक्टरनं एकदा एका पेशंटला सल्ला दिला…

रोज किमान १० किलोमीटर चाला!

पेशंटनं तो सल्ला तंतोतंत पाळला आणि वर्षभरानंतर डॉक्टरला फोन केला!

डॉक्टर साहेब, अफगाणिस्तानला पोहोचलोय, तिथंच थांबू की रशियाच्या दिशेनं जाऊ?

डॉक्टरनं आता प्रॅक्टिस सोडून दिलीय…

एक बाई एका वळूला तुपात तळलेल्या भाकरी खायला घालत होती…

हे एका व्यक्तीनं बघितलं. त्याला वाटलं ही बाई वळूला गाय समजून खायला देतेय!

तो म्हणाला, अहो ताई, हा वळू आहे. गाय नाही. 

तुम्ही त्यालाा खायला घालताय, पण हा रोज दोन-चार लोकांना शिंग मारतो…

बाई - मला माहीत आहे भाऊ की हा वळू आहे. 

माझा नवरा डॉक्टर आहे. त्याचा दवाखाना या वळूमुळंच चालतो!

आता बोला!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel