मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : नवरा जेव्हा बायकोला म्हणतो, तू साखर असतीस तर…

Joke of the day : नवरा जेव्हा बायकोला म्हणतो, तू साखर असतीस तर…

HT Marathi Desk HT Marathi
Jan 16, 2024 10:11 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

नवरा मन लावून पुस्तक वाचत होता. बायको बाजूलाच काहीतरी करत होती.

वाचता-वाचता नवरा म्हणाला, लेखक म्हणतो की नवऱ्यांनाही बोलण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे…

हे ऐकून बायको जोरजोरात हसायला लागली!

नवरा चकीत झाला. तो म्हणाला, हसायला काय झालं?

बायको म्हणाली, नवऱ्यांच्या स्वातंत्र्याबद्दल सांगणारे महाशय स्वत:ही बोलू शकत नाहीत. त्यांनाही लिहून सांगावं लागतंय.

नवरा पुस्तक तोंडावर ठेवून झोपून गेला…

Joke of the day : बंड्याच्या उत्तरानं मॅडम जेव्हा कन्फ्युज होतात…

नवरा बायकोला म्हणाला, तू साखर असतीस तर किती बरं झालं असतं…

कधी तरी गोड बोलली असतीस!

 बायको - तुम्ही अद्रक असता तर किती बरं झालं असतं.

मनापासून कुटलं असतं…

नवरा कोमात, बायको जोमात…

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel