Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
बायको : काय हो, तुम्ही मला झोपेत शिव्या देत होता?
नवरा : नाही, नाही… तुझा काहीतरी गैरसमज झालाय
बायको : कसला गैरसमज? मी माझ्या कानानं ऐकलंय
नवरा : हो गं… पण मी झोपलो होतो हा तुझा गैरसमज आहे…
त्यानंतर अनेक दिवस नवरा नीट झोपू शकलेला नाही!
शाळेत गणिताचा तास सुरू असतो…
मॅडम बंड्याला विचारतात,
बंड्या मला सांग, एक हजार किलो म्हणजे एक टन
मग तीन हजार किलो म्हणजे किती टन
बंड्या : क्षणाचाही वेळ न लावता म्हणाला, टन… टन… टन…
मॅडमना कळेना. बंड्याला शाबासकी देऊ की वर्गाच्या बाहेर काढू?
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
संबंधित बातम्या