Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
एक बाई घाबरलेल्या अवस्थेत डॉक्टरकडं जाते…
बाई - डॉक्टर साहेब, माझ्या नवऱ्यानं पॅनकार्ड गिळलंय, काही तरी करा हो…
डॉक्टर - शांत व्हा बाई… त्यांना आधार कार्ड सुद्धा गिळायला सांगा…
दोन्ही लिंक झाल्याशिवाय काही करता येणार नाही!
…
बॉसनं सर्व कर्मचाऱ्यांसमोर एक दगड पाण्यात फेकला आणि विचारलं,
हा दगड पाण्यात का बुडाला?
सर्वांनी सांगितलं दगड जड होता म्हणून बुडाला…
बॉसनं त्याच्या चमच्याला विचारलं…
त्यांना खूप सुंदर उत्तर दिलं…
सर, ज्यांनी तुमचा हात सोडला तो बुडतोच!
जीवनात असेच चमचे खूप प्रगती करतात!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)
संबंधित बातम्या