मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : एखाद्या पुरुषाचं लग्न झालंय हे कसं कळतं?

Joke of the day : एखाद्या पुरुषाचं लग्न झालंय हे कसं कळतं?

HT Marathi Desk HT Marathi
Jan 11, 2024 10:00 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

नवरा : तू म्हणतेस, स्त्रियांनी दागिने, मंगळसूत्र घातलं की लोकांना कळतं हिचं लग्न झालेलं आहे. मग पुरुषांचं कसं कळतं?

बायको : पुरुषांचं काय, त्यांचं थोबाड बघितलं तरी कळतं की ह्याचं लग्न झालेलं आहे. 

नवरा कोमात, बायको जोमात…

गुरुजी : मुलांनो सांग, सर्वात भयंकर अंमली पदार्थ कोणता?

बंड्या : सर पुस्तक… कारण ते उघडताच झोप येते!

गुरुजींनी बंड्याला सुजव सुजव सुजवला!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel