Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
गोट्या : यार, काल रात्री घरी उशिरा गेलो म्हणून बायकोनं रागानं पडदे फाडून टाकले.
पिंट्या : हे बरं झालं, बायकोनं तुझ्यावरचा राग पडद्यांवर काढला. तू वाचलास!
गोट्या : अरे बाबा, मी घरातल्या पडद्यांंचं बोलत नाहीए. माझ्या कानाचे पडदे फाडले!
पिंट्या अजून हसतोय…
दारू पिण्यावरून नवरा बायकोमध्ये भांडण सुरू झालं...!
बायको : दारूमध्ये पैसे वाया घालवायची काय गरज आहे? असाच संसार करणार का?
नवरा : तू ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महिन्याला ५-५ हजार उधळतेस, त्याचं काय?
बायको : मला हौस नाही. तुमची बायको सुंदर दिसावी. तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी हे सगळं करते.
नवरा : मग मला पैसे उडवायची हौस आहे म्हणून मी दारू पितो असं तुला वाटतं का? तू मला सुंदर दिसावीस म्हणूनच मी पितो…
बायको कोमात, नवरा जोमात…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)