Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
मेहुणी : भावोजी, पुढच्या जन्मात तुम्हाला काय व्हायला आवडेल?
भावोजी : मी पुढच्या जन्मात उंदीर होईन!
मेहुणी : का? उंदीरच का?
भावोजी : कारण, तुझी बहीण फक्त उंदरांनाच घाबरते...
…
मॅडम : मला सांगा, आय लव्ह यू या शब्दाचा शोध कुठे लागला?
बंड्या : चीनमध्ये लागला मॅडम
मॅडम : ते कसं काय?
बंड्या : त्या शब्दात चायनीज वस्तूमध्ये असतात तेच गुण आहेत, ना गॅरण्टी, ना वॉरण्टी…
मॅडम कोमात, बंड्या जोमात…
…
गोलू : मी केळी न सोलताच खातो.
भोलू : भाई, सोलून खात जा...
गोलू : कशाला सोलायचं? त्यात केळी आहे हे माहीत असतं आपल्याला...
गोलूचं हे लॉजिक ऐकून भोलू चक्कर येऊन पडला…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)