Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
पप्पू : भाऊ, स्कूटर स्टँड कुठं आहे?
गप्पू : तुझं नाव काय?
पप्पू : माझं नाव पप्पू
गप्पू : तुझ्या आई-वडिलांचं नाव काय?
पप्पू : मला पिक्चर बघायला जायचंय. कशाला वेळ घालवता? लवकर सांगा ना स्कूटरचं स्टँड कुठं आहे?
गप्पू : म्हणूनच मी विचारतोय, तुझ्या आई-वडिलांचं नाव काय?
पप्पू : माझ्या आईचं नाव मीना आहे, ती शिक्षिका आहे.
माझ्या वडिलांचं नाव सुरेश आहे आणि ते वकील आहेत.
गप्पू : सगळे शिकलेले आहेत.
पप्पू : आता सांगा भाऊ स्कूटर स्टँड कुठं आहे?
गप्पू : शिकलेल्या आई-बापाच्या अडाणी पोरा, स्कूटरचा स्टँड स्कूटरच्या खाली आहे.
पप्पू जागेवरच बेशुद्ध…
…
बघण्याचा कार्यक्रम सुरू असतो. मुलगा-मुलगी एकांतात बोलायला जातात…
मुलगी : काय काम करतोस...?
मुलगा : मी लेखक आहे.
मुलगी : काय लिहितोस?
मुलगा : मला तुझा नंबर दे ना… तुझा फोटो दाखव… तू फारच सुंदर दिसतेयस… असं काहीबाही मी लिहित असतो…
त्या मुलाचं अजूनही लग्न झालेलं नाही!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)