मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : चॅलेंज कशाला म्हणतात, असा प्रश्न जेव्हा परीक्षेत येतो…

Joke of the day : चॅलेंज कशाला म्हणतात, असा प्रश्न जेव्हा परीक्षेत येतो…

HT Marathi Desk HT Marathi
Jan 06, 2024 10:06 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

ट्रेंडिंग न्यूज

डॉक्टर पेशंटला : माझ्या औषधानं तू बरा झालास तर मला काय बक्षीस देशील?

पेशंट: साहेब, मी खूप गरीब माणूस आहे. स्मशानात कबरी खोदायचं काम करतो.

मी तुम्हाला काय देणार?

मी तुमची कबर फुकट खोदून देईन…

मधुचंद्राच्या रात्री नवरा बायको लाडानं एकमेकांशी बोलत असतात…

नवरा गंमतीनं विचारतो, मी मेलो तर?

बायको (त्याच्या तोंडावर हात ठेवत) असं अभद्र बोलू नका.

नवरा : समजा, मी मेलो तर तू लगेच दुसरं लग्न करशील का?

बायको : नाही लगेच नाही. २-३ महिने थांबावं लागेल ना, नाहीतर लोक काय म्हणतील?

नवरा तेव्हापासून मानसिक धक्क्यात आहे…

परीक्षेत प्रश्न आला… चॅलेंज कशाला म्हणतात?

पप्पूनं संपूर्ण पेपर कोरा ठेवला आणि शेवटच्या पानावर लिहिलं…

हिम्मत असेल तर पास करून दाखवा!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel