Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.
दातांचा डॉक्टर : तुमचा दात किडलाय. तो काढावा लागेल.
राजू : किती पैसे लागतील डॉक्टर?
डॉक्टर : फक्त ५०० रुपये लागतील.
राजू : मग असं करा, ५० रुपये घ्या आणि जरा ढिला करा. घरी जाऊन मी स्वतः काढतो.
राजूचं बोलणे ऐकून डॉक्टर डोकं आपटायला लागला…
…
नवरा : ऐक, मला जादूचा दिवा सापडला आहे. आपण जे मागू ते तो देतो.
बायको : व्वा, मग तुम्ही काय मागितलं त्याच्याकडं?
नवरा : मी म्हणालो, माझ्या बायकोची बुद्धी १० पट वाढव.
बायको : मग काय केलं त्यानं?
नवरा : तो हसायला लागला आणि म्हणाला शून्याला कशानंही गुणलं तरी शून्यच येतं.
जादूचा दिवा आणि नवरा दोघेही बेपत्ता आहेत...
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)