मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Joke of the day : बायकोच्या तोंडात जेव्हा मच्छर जातो…

Joke of the day : बायकोच्या तोंडात जेव्हा मच्छर जातो…

HT Marathi Desk HT Marathi
Jan 04, 2024 10:02 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes
Viral Marathi Jokes

 

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

 

बायको - अहो ऐका ना…

नवरा - बोल 

बायको - माझ्या तोंडात मच्छर गेलाय… काय करू?

नवरा - सोप्पं आहे. ऑल आउट पिऊन टाक. सहा सेकंदांत काम सुरू

नवरा दिवसभर घरातून 'आउट' आहे

प्रेयसी - मला सतावू नको. माझं डोकं दुखतंय

प्रियकर हळूच तिच्या कपाळाचं चुंबन घेतो आणि विचारतो, आता कसं वाटतंय?

प्रेयसी - आता बरं वाटतंय

नंतर म्हणते मला सतावू नको, माझे डोळे चुरचुरतायत

प्रियकर अलगद तिच्या डोळ्यांचं चुंबन घेतो आणि विचारतो, आता कसं वाटतंय?

प्रेयसी लाडिकपणे म्हणते, आता खूप बरं वाटतंय!

तेवढ्यात समोरच्या सीटवर बसलेला माणूस उठतो आणि त्या तरुणाला विचारतो,

बाळा, मूळव्याधाचा उपाय आहे का?

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

WhatsApp channel